CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:28 PM2020-09-07T16:28:05+5:302020-09-07T16:41:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

CoronaVirus Marathi News india 90000 new corona cases since 2 days but good news | CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी समोर आली असून मोठा दिलासा मिळाला आहे. 

सोमवारी (7 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,802 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,016 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 42,04,614 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 71,642  वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ 

शुक्रवारी आणि शनिवारी 70 हजारांहून अधिक लोक बरे झाले. तर शनिवारी 73,642 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सोमवारी 69,564 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,82,542  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. देशातील मृत्यूदर हा 1.72% आहे. देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. 

कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. हिमाचल प्रदेश, मणिपूर, चंडीगड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, अंदमान निकोबार, लडाख, मेघालय, सिक्किम आणि मिझोरममध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही 15 हजारांहून कमी आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आसाम, ओडिशा आणि गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अ‍ॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"

चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

Web Title: CoronaVirus Marathi News india 90000 new corona cases since 2 days but good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.