CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:41 AM2020-07-02T08:41:34+5:302020-07-02T08:45:15+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यात अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या, तर रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. भारतामध्ये एकूण कोरोना रुग्णांपैकी २ लाख २० हजारांहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, ३ लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र याच दरम्यान देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्येने तब्बल सहा लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती मिळत आहे.
पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. भारतात या आधी रुग्णांची संख्या एक लाख होण्यासाठी ११० दिवसांचा कालावधी लागला होता. त्यानंतर गेल्या ४५ दिवसांत पाच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. covid19india.org ने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचे एकूण ६, ०१, ९५२ रुग्ण आढळून आले. यापैकी ३,५७,६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७, ७८५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढला! लागण होण्यामागचं 'हे' कारण माहितीय का?https://t.co/sxcZ0EINhe#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
देशातील एकूण रुग्णांपैकी १.८० लाखांहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. यानंतर तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. या शिवाय हरियाणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये वेगाने कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणे दोन लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असून, त्यानंतर तामिळनाडू (९० हजार १६७), दिल्ली (८७ हजार ३६०) व गुजरातचा (३२ हजार ५५७ रुग्ण) क्रमांक लागतो. साथीचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांनी आता काही ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गेले पाच दिवस त्यांच्यात किमान १८ हजारांनी भर पडत आहे. तीन जूनला कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर होती. कोरोना रुग्णांची तीन लाख संख्या होण्यासाठी फक्त १० दिवस लागले तर चार लाख होण्यासाठी ८ दिवस लागले. त्यानंतर आता गेल्या पाच दिवसांत कोरोनाचे एक लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.
मास्क लावायला सांगितला अन्... सरकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार, Video व्हायरलhttps://t.co/0ve8khc246#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#mask
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे. १,७४,००० पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत ७८५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. 90 हजारांहून अधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांत तामिळनाडूचा दुसरा क्रमांक लागतो. 87 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण दिल्लीमध्ये आहेत. 32 हजारांहून अधिक गुजरातमध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये २३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
CoronaVirus News : मृतदेहांचा 'तो' Video व्हायरल...https://t.co/CbAOtE9ctk#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"
"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण