CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 08:36 AM2020-08-23T08:36:24+5:302020-08-23T08:42:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News india covid 19 cases crossed the 30 lakh mark | CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 30 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 69,874 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 लाख  75 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 55,794 वर पोहोचला आहे. यानंतर आता पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्या ही 30 लाखांच्या वर गेली असून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. 

रिपोर्टनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या ही 30,37,657 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 56,762 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 22,71,054 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे. रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढले असून 74.69 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका, ब्राझील नंतर आता भारताचा तिसरा क्रमांक आहे. 

देशातील कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले असून गेल्या 24 तासांत दहा लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 3,44,91,073 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आठ लाखांच्या वर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी गडबड?, CBI ला शंका; डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात

मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

Web Title: CoronaVirus Marathi News india covid 19 cases crossed the 30 lakh mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.