CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:53 AM2020-05-19T10:53:16+5:302020-05-19T10:59:45+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 48 लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी 5242 रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनी घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता लॉकडाऊनच्या काळातच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12 दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा देशात सध्या चौथा टप्पा सुरू आहे. त्यावेळी देशात कोरोना व्हायरसचे 606 रुग्ण होते. त्यानंतर 14 एप्रिलला पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यावेळी कोरोनाग्रस्तांच्या संख्या 11,439 झाली.
COVID19 cases cross 1 lakh mark with a single-day jump of 4970 cases & 134 deaths; total cases 101139 & death toll 3163: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/i16FULqLjn
— ANI (@ANI) May 19, 2020
दुसरा लॉकडाऊन 3 मेपर्यंत चालला. यादरम्यान रुग्णांची संख्या 42,533 झाली. तर तिसरा लॉकडाऊन 17 मे रोजी संपला. केवळ 12 दिवसात भारतात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत लागू करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. भारतातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. 24 मार्चपासून 31 मेपर्यंतचा 69 दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणीhttps://t.co/jBlzPGxFyr#CoronaUpdatesInIndia#ICMR#ICMRFIGHTSCOVID19
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
देशातील अन्य राज्यांना कोरोनाने विळखा घातला असून महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्लीतील रुग्णांची संख्या 10,000 वर गेली आहे. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, बिहारचा क्रमांक लागतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील स्थिती गंभीर बनली आहे. ICMRने देशात वाढणारी कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता आपल्या रणनीतीमध्ये काही बदल केले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण आणि प्रसार रोखणे हा नव्या रणनीतीचा उद्देश आहे. इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चने (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी नियमामध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
CoronaVirus News : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?https://t.co/QWfk9TjWvs#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#Xray
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी
CoronaVirus News : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?
CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार
CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनातून बरी होऊन डॉक्टर घरी आली; शेजाऱ्यांनी केलं असं काही...
CoronaVirus News : बापमाणूस! रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसाठी तो झाला 'श्रावणबाळ'