CoronaVirus News : फक्त 12 दिवसांत 5 लाख नवे रुग्ण; देशात कोरोनाचा वेग वाढला, चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 03:18 PM2020-07-29T15:18:10+5:302020-07-29T15:24:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर गेली असून एकूण रुग्णांची संख्या 16,917,714 आहे. तर 663,942 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे.
देशात कोरोनाचा वेग वाढला असून चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. फक्त 12 दिवसांत कोरोनाचे तब्बल 5 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. ब्लूमबर्ग कोरोना व्हायरस ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी 20 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात जानेवारीमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 148 दिवस लागले. मात्र त्यानंतर कमी दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
CoronaVirus News : उंच लोकांसाठी कोरोना जीवघेणा?, जाणून घ्या कितपत आहे धोकाhttps://t.co/5GeblPEkkL#coronavirus#CoronaUpdates#COVID19
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2020
देशात गेल्या 24 तासांत 768 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 34,193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीआणकडे कर्नाटक, केरळ, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि आसाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.
जिंकलंस मित्रा! कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या महिलेला सोनूने दिली ऑफर https://t.co/pa2UroTth1#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#SonuSood#SonuSoodRealHero
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2020
कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांना कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडल्याची माहिती मिळत आहे. ही औषधं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे.
CoronaVirus News : कौतुकास्पद! कोरोनावर मात करून मदतीसाठी तत्परhttps://t.co/p0RMzTo5iU#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!
दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात
"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"
CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा