CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:11 PM2020-05-25T15:11:32+5:302020-05-25T15:23:09+5:30
'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा झाला आहे, असे हर्षवर्धन म्हणाले.
नवी दिल्ली : देशत कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 6977 नवे कोरोनाबाधित समोर आले. तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळच्या सुमारास जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 38 हजार 845वर पोहोचला आहे. यापैकी 4 हजार 21 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशभरात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 57 हजार 721 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आता देशात एकूण 77 हजार 103 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, भारत कोरोना संक्रमानाच्या बाबतीत इराणलाही (1,25,701) मागे टाकत टॉप 10 देशांच्या यादीत पोहोचला आहे.
महाराष्ट्राचा विचार करता, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 50, 231 झाली आहे. तर 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 394 नवे रुग्ण आढळले असून येथील कोरोना संक्रमित रुग्णांची संक्या आता 14,063 वर पोहोचली आहे. तर येथे आतापर्यंत 858 जणांचा मृत्यू झाला आहे.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 41.28 टक्के आहे. तपासणीतही वेग आला आहे. सध्या रोज जवळपास 1,50,000 टेस्ट होत आहेत. ते म्हणाले, 'कालच आम्ही 1,10,397 नमुने तपासले आहेत. कालपर्यंत आम्ही 29,44,874 नमुने तपासले आहेत.
'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा झाला आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले.