CoronaVirus News : भारतासाठी आनंदाची बातमी; "अमेरिका, इटली सारखा धोका नाही, अत्यंत वाईट परिस्थितीसाठीही देश तयार"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:25 PM2020-05-09T15:25:08+5:302020-05-09T16:59:07+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता.
नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घालत आहे. अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान्स सारख्या विकसित देशांमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतात मात्र, तशी परिस्थिती उद्भवणार नाही, असे केंद्र सरकारचा अंदाज सांगतो. यासंदर्भा, आरोग्य तथा कुटुंब कल्यानमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की 'देश वाईटातल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठीही तयार झाला आहे. अनेक विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती उद्भवली, तशी स्थिती भारतात उद्भवेल, असे दिसत नाही.'
या गोष्टीमुळे दिसतो आशेचा कीरण -
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा दर 3.3 टक्के आहे. तर भारतातील रिकव्हरी रेट 29.9% झाला आहे. हे फार चांगले संकेत आहेत, असेही हर्षवर्धन म्हणाले.
आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी
रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या नियमांत बलद -
कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी याबद्दलची माहिती देण्यात आली. नव्या नियमांनुसार एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्यास आणि त्याची प्रकृती स्थिर असल्यास १० दिवसांतच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. डिस्चार्जनंतर रुग्णाला १४ दिवसांऐवजी ७ दिवस घरात क्वारंटिन करण्यात येईल. चौदाव्या दिवशी टेलि-कॉन्फरन्सच्या माध्यमातून रुग्णाची माहिती घेतली जाईल.
देशात जवळपास 2 हजार जणांचा मृत्यू -
भारतात शनिवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 59 हजारवर पोहोचली. तर आतापर्यंत जवळपास 1,981 जणांचा कोरोनाने बळी घेतला. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे आतापर्यंत 19,063 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 731 जणांचा मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका
जगात 2.70 लाख जणांचा मृत्यू -
जगभरात आतापर्यंत 2,70,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखहून अधिक झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत 77,180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड असून, येथे आतापर्यंत 31,316 जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे जगाची स्थिती :
CSSEने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक 1,283,929 रुग्ण आढळले आहेत. यानंतर स्पेन, येथे 222,857, इटली 217,185, इग्लंड (212,629), रशिया (187,859), फ्रान्स 176,202, जर्मनी 170,588आणि, ब्राजीलमध्ये 146,894 रुग्ण आढळून आले आहेत.
आणखी वाचा - 'औरंगजेबा'ने बनवले होते मुस्लीम, तब्बल 40 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात केला प्रवेश