CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 24,882 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:05 AM2021-03-13T10:05:22+5:302021-03-13T10:11:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 11 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 24,882 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 140 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,13,33,728 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,58,446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (13 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.
India reports 24,882 new #COVID19 cases, 19,957 recoveries, and 140 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) March 13, 2021
Total cases: 1,13,33,728
Total recoveries: 1,09,73,260
Active cases: 2,02,022
Death toll: 1,58,446
Total vaccination: 2,82,18,457 pic.twitter.com/etzHqWY9r1
11,11,11! कोरोनाचा अजब योगायोग; 22 हजार रुग्ण, नागपूर लॉकडाऊन पुन्हा घाबरवणारा तर जगभरात...
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येवरुन प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. नागपुरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाऊन काळात नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी, 2,633,324 हून अधिक लोकांना गमवावा लागला जीव https://t.co/V7xCZL6pHO#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#CoronaVaccine#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतो आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस देण्यात आली. त्यानंतर आता सर्वसामान्यांना देण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. गेल्या वर्षी 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं होतं. कोरोनाचा वेग थोडा मंदावत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय घेण्यात येत असून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
Corona Vaccine : कोरोनाच्या संकटात रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासाhttps://t.co/QWS4ct8Cmb#Reliance#RelianceIndustries#CoronaVirusUpdates#CoronaVaccine#MukeshAmbani#NitaAmbani
— Lokmat (@MiLOKMAT) March 5, 2021
Corona Vaccine : थेट धर्माशी जोडला लसीचा संबंध, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीत केली 'ही' मागणीhttps://t.co/2fapH5xcC7#coronavirus#CoronaVaccine#India#Congresspic.twitter.com/UjBavpslno
— Lokmat (@MiLOKMAT) March 8, 2021