CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:32 AM2020-07-03T10:32:21+5:302020-07-03T10:44:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

CoronaVirus Marathi News India reports highest single-day spike 20,903 new COVID19 | CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

Next

नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 6,25,544 वर गेला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (3 जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,903 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 379 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 6 लाख 25 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 18 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,27,439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,79,892 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल केले आहेत. 

देशातील रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत नाही मात्र चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता कोणतंही लक्षण नसलेल्या रुग्णांचा समावेश हा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये करण्यात येऊ शकतो. तसेच एचआयव्ही, कॅन्सर यासारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती होम आयसोलेशनसाठी योग्य नसल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, मधमेह, हृदय आणि किडनी संबंधीत आजार असलेल्या मंडळींना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल असं देखील म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

 

Web Title: CoronaVirus Marathi News India reports highest single-day spike 20,903 new COVID19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.