CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही कमी

By सायली शिर्के | Published: October 13, 2020 10:47 AM2020-10-13T10:47:40+5:302020-10-13T10:47:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

CoronaVirus Marathi News India reports spike 55,342 new COVID19 cases in last 24 hours | CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही कमी

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही कमी

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 71,75,881 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. तसेच देशातील मृत्यूदर देखील कमी झालेला आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजच्या नव्या रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. याआधी कोरोनाचे 60 हजार रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी (13 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 71,75,881 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,09,856 वर पोहोचला आहे. 

ऑक्टोबर महिन्यात सलग दिलासा देणारी आकडेवारी

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,38,729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 62,27,296 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. 1 ऑक्टोबरनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेलेली नाही. येत्या काळातही हेच चित्र राहिल्यास लवकरच कोरोना रुग्णांची संख्या घटत जाईल.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बळींची संख्याही एक हजारहून कमी 

कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी 78 लाखांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबर रोजी 9,94,851 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता 8,72,093 झाली आहे. देशामध्ये दररोजच्या रुग्णवाढीचा आकडा उतरणीला लागला असून, गेल्या सलग नऊ दिवसांपासून कोरोना बळींची संख्याही एक हजारहून कमी आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. देशभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. मात्र रुग्णांच्या आकडेवारीनुसार काही राज्यांमध्ये ते आणखी वाढवण्याची गरज आहे.

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात थोडा दिलासा पण "या" राज्यांनी वाढवली चिंता

कोरोनाच्या संख्येत थोडासा दिलासा मिळाला असला तरी देशातील चार राज्यांनी चिंतेत भर टाकली आहे. या राज्यात कोरोनाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,09,856 लोकांना जीव गमवावा लागला आहे. केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये या महिन्याच्या सुरुवातीच्या अकरा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 60 टक्के वाढ झाली आहे. कोझीकोडमध्ये 62.2%, त्रिसूरमध्ये 61.9%, कोल्लम मध्ये 57.9% केसेस वाढल्या आहेत. 

Read in English

Web Title: CoronaVirus Marathi News India reports spike 55,342 new COVID19 cases in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.