CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!
By सायली शिर्के | Published: September 26, 2020 09:43 AM2020-09-26T09:43:44+5:302020-09-26T09:51:40+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 59 लाखांचा टप्पा पार केला आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखा देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 59 लाखांचा टप्पा पार केला आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 85,362 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,089 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 59,03,933 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 93 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
India's #COVID19 case tally crosses 59-lakh mark with a spike of 85,362 new cases & 1,089 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 26, 2020
The total case tally stands at 59,03,933 including 9,60,969 active cases, 48,49,585 cured/discharged/migrated & 93,379 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/fTL9qjTu8p
शनिवारी (26 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 85,362 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 59,03,933 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 93,379 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 9,60,969 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 48,49,585 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
CoronaVirus News : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरू नका तर...; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्लाhttps://t.co/YbUDLOfvbA#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 22, 2020
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा
कोरोनाच्या संकटात काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. डॉक्टरचा सल्ला घेण्याऐवजी अनेक जण हे आजारी पडल्यास मेडिकलमधून औषध घेतात. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय इतर कोणतीही औषधं घेणं हे जीवावर बेतू शकतं. योग्य वेळी उपचार न झाल्यास ते महागात पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना रुग्ण हे उपचारासाठी उशीरा दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात घाबरू नका, वेळीच योग्य उपचार करा असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एम्सच्या मेडिसिन विभागाचे एसोसिएट प्रोफेसर डॉ. नीरज निश्चल यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क नक्की घाला. तसेच कोरोनाची लागण झाल्यास ते इतरांपासून लपवून न ठेवता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
CoronaVirus News : पलायन केलेल्या वैज्ञानिकांनी केला WHO वर गंभीर आरोपhttps://t.co/2z7J7R8QJk#coronavirus#CoronaUpdates#COVID19#WHO#Chinapic.twitter.com/FXlF8tXJ6k
— Lokmat (@MiLOKMAT) September 23, 2020
होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने आरोग्याची नीट काळजी घ्यावी. ताप आला अथवा श्वास घेण्यास त्रास झाला तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हा, ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजन तपासा असं देखील निश्चल यांनी म्हटलं आहे. लोकनायक रुग्णालयातील डॉ. सुरेश कुमार यांनी "कोरोनाच्या काही रुग्णांची अवस्था ही गंभीर आहे. त्यामुळे नियमांचं पालन करा. बेजबाबदारपणा योग्य नाही, सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून जाऊ नका. घाबरून आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. लक्षणं नसल्यास घराच्या मंडळींपासून थोडं वेगळं राहा, स्वत:ला आयसोलेट करून घ्या. कोरोनाची लागण झाल्यास शुगर, ब्लड प्रेशर, कॉलेस्ट्रॉल, डी-डाइमर हे देखील तपासणं गरजेचं आहे. तसेच होम आयसोलेशनच्या काळात वैद्यकीय सल्ला घ्या" अशी माहिती सुरेश कुमार यांनी दिली आहे.
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार!https://t.co/rWi6QnRCIK#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल
Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"
गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली