CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 09:06 PM2020-06-02T21:06:29+5:302020-06-02T21:20:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.
बरेली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 63 लाखांवर पोहोचली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 377,889 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,389,493 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.
माणसांप्रमाणेच आता प्राण्यांसाठीही लस तयार करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे भारतातील शास्त्रज्ञांनी त्या दिशेने तयारी देखील सुरू केली आहे. बरेलीतील इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) पाळीव आणि जंगली प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार आहे. आयआयटी रूकीसह ही लस विकसित केली जाणार आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्राण्याला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. मात्र न्यूयॉर्कमध्ये एक वाघ आणि हाँगकाँगमध्ये काही पाळीव प्राणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. भविष्यात प्राण्यांमध्ये कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेत लस विकसित केली जाते आहे.
सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणार, देशात पेट्रोल-डिझेल महागणार https://t.co/bpZDwwBHhM#fuelhike#petrolPrice#diesel
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2020
IVRI चे संचालक आर. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च (ICAR) चे डायरेक्टर जनरल यांच्या निर्देशानुसार पाळीव आणि जंगली प्राण्यांसाठी कोरोना लस विकसित करण्याचा विचार करत आहोत. तसेच लॅब आणि फिल्डवर वापरता येईल अशी डानोस्टिक टेस्ट तयार करण्याचाही विचार आहे'. भविष्यात प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरला तर व्हायरस आपल्यात जेनेटिक बदल करेल आणि तेदेखील आजारी पडू शकतात. प्राण्यांमधील कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सध्या संशोधन करण्यात येत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पालकांमध्ये भीतीचे वातावरणhttps://t.co/aK2DsghwhG#CoronaVirusUpdate#coronavaccines#childern
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2020
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसविरोधातील लसींची चाचणी सुरू आहे. काही लसींची मानवी चाचणी सुरू झालेली आहे. यामध्ये आता लहान मुलांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसीची आता लहान मुलांवरही चाचणी केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 5 ते 12 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. मुलांवरील उपचारासाठी याची गरज पडू शकते त्यामुळे शास्त्रज्ञांनी हा निर्णय घेतला आहे.
CoronaVirus News : फोन, नोटा, कपडे यासह अनेक वस्तू अशा करा सॅनिटाईजhttps://t.co/1WAvhcL9fx#coronavirusinindia#coronaupdatesindia#technology
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट
इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण
धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?
'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल
CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त