CoronaVirus News : देशात 4 महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोविड जैववैद्यकीय कचरा झाला निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 02:16 PM2020-10-13T14:16:04+5:302020-10-13T14:23:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रात 3,587 टन जैववैद्यकीय कचरा आहे अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News june to september corona waste produced by 18000 tons | CoronaVirus News : देशात 4 महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोविड जैववैद्यकीय कचरा झाला निर्माण

CoronaVirus News : देशात 4 महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोविड जैववैद्यकीय कचरा झाला निर्माण

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांची संख्या 71 लाखांवर पोहोचली आहे. तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पीपीई किटचा वापर करतात. मात्र देशात गेल्या चार महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोरोना जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. त्यातील सर्वाधिक कचरा हा महाराष्ट्रातील आहे. 

महाराष्ट्रात 3,587 टन जैववैद्यकीय कचरा आहे अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. देशभरात फक्त सप्टेंबरमध्ये सर्वाधिक म्हणजे 5500 टन कोरोना जैववैद्यकीय कचरा तयार झाला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जूनपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अठरा हजार सहा टन कोरोनासंबंधित जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. या कचऱ्याची 198 सामान्य जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया सुविधा युनिटद्वारे विल्हेवाट लावली जात आहे. 

जूनपासून चार महिन्यांत सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा महाराष्ट्रात झाला निर्माण

कचऱ्यामध्ये पीपीई किट, मास्क, बुटांची आच्छादने, ग्लोव्ह्ज, रक्ताने दूषित वस्तू, प्लास्टरसाठी वापरलेले साहित्य, कापूस, रक्ताच्या पिशव्या, सुया, सीरिंज आदी गोष्टींचा समावेश होतो. जूनपासून चार महिन्यांत सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 3587, तामिळनाडूत 1737, गुजरातमध्ये 1638, केरळमध्ये 1516, उत्तर प्रदेशमध्ये 1416, दिल्लीत 1400 , कर्नाटकात 1380 आणि पश्चिम बंगालमध्ये 1000 टन कचरा निर्माण झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही कमी

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 71,75,881 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. तसेच देशातील मृत्यूदर देखील कमी झालेला आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजच्या नव्या रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. याआधी कोरोनाचे 60 हजार रुग्ण आढळले आहेत.

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात थोडा दिलासा पण "या" राज्यांनी वाढवली चिंता

कोरोनाच्या संख्येत थोडासा दिलासा मिळाला असला तरी देशातील चार राज्यांनी चिंतेत भर टाकली आहे. या राज्यात कोरोनाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,09,856 लोकांना जीव गमवावा लागला आहे. केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये या महिन्याच्या सुरुवातीच्या अकरा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 60 टक्के वाढ झाली आहे. कोझीकोडमध्ये 62.2%, त्रिसूरमध्ये 61.9%, कोल्लम मध्ये 57.9% केसेस वाढल्या आहेत. 

Web Title: CoronaVirus Marathi News june to september corona waste produced by 18000 tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.