धक्कादायक! CM येडियुरप्पांच्या संपर्कात आलेले 6 लोक कोरोना पॉझिटिव्ह, क्वारंटाइन 75 जणांत 3 उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 07:01 PM2020-08-04T19:01:25+5:302020-08-04T19:10:36+5:30
पहिल्या बॅचमध्ये ज्या 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांत संक्रमित आढळून आलेल्या या 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इतर 45 कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
बेंगळुरू -कर्नाटकात काही वरिष्ठ नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी संक्रमित असण्याची भीती आहे. यामुळे कर्नाटकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (chief minister BS Yediyurappa) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया (former CM Siddaramaiah), हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, वेगाने कोरोना तपासणी केली जात आहे. येडियुरप्पा यांचे 6 कर्मचारी आधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
याशिवाय येडियुरप्पा यांच्या संपर्कात आलेल्या 75 जणांची तपासणी केली असून, त्या सर्वांना तपासणी अहवाल येईपर्यंत घरातच वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. यांत मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, जवळचे मित्र, घरी काम करणारे, संरक्षण कर्मचारी आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे.
पहिल्या बॅचमध्ये ज्या 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांत संक्रमित आढळून आलेल्या या 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इतर 45 कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. येडियुरप्पा गेल्या एका आठवड्यातच तीन उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळातील 7 मंत्री आणि 10 आमदारांना भेटले होते.
पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी अनेक मोठ्या व्यक्तींची घेतली होती भेट -
येडियुरप्पा यांनी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. त्यांनी बेंगळुरू शहराचे नवे पोलीस आयुक्त कमल पंत यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांनी, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) तयार करण्यात योगदा दिल्याबद्दल, माजी ISRO वैज्ञानिक के. कस्तूरीरंगन यांना भेटून शुभेच्छाही दिल्या होत्या. कस्तूरीरंगन यांनी एनईपीचा मसुदा तयार करण्यात मदत केली होती.
सिद्धारमैया, येडियुरप्पा आणि त्यांची मुलगी एकाच रुग्णालयात -
येडियुरप्पा आणि त्यांची मुलगी, मणिपाल रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना मंगळवारी याच रुग्णालयात दाख करण्यात आले. सिद्धारमैया यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...