CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 03:56 PM2020-07-18T15:56:30+5:302020-07-20T10:48:31+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या चिमुकल्यांमध्ये कावासाकी या नावाच्या गंभीर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत.
नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर पोहोचली आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचे एकूण 10,38,716 रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34,884 नवे रुग्ण आढळून आले असून 671 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 26,273 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विविध ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीतील काही रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या चिमुकल्यांमध्ये कावासाकी या नावाच्या गंभीर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे. तसेच यामध्ये मुलांना तापही येतो अशी माहिती मिळत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! हादरवणाऱ्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक https://t.co/9wJqNWKxAx#coronavirus#CoronaUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त लहान मुलांमध्ये कावासाकी आजाराची लक्षणं दिसत येत आहेत. यामध्ये शरीरावर सूज येणे, जखम होणे अशा लक्षणांचा समावेश आहे. कावासाकी हा 5 वर्षाखालील मुलांना होणारा व रक्तवाहिन्या, हृदयावर परिणाम करणारा आजार आहे. दिल्लीतील कलावती सरन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूज येणे...जखम होणे ही सगळी कावासाकी आजाराची सामान्य लक्षणे आहेत. जी जगभरात आढळून येतात. या आजारामुळे दिल्लीत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लढ्याला यश! घरबसल्या करता येणार कोरोना टेस्ट, अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्टhttps://t.co/pw6uhDDCce#coronavirus#CoronaUpdates#Corona#oxforduniversity
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14,194,140 वर गेली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 599,416 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटना देखील समोर येत आहेत. जगभरात 8,470,275 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या संकटात आशेचा किरण दिसत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आणखी एक यश मिळालं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ब्रिटनच्या प्रमुख फर्मसोबत मिळून 'गेम चेंजिंग' अँटीबॉडी टेस्ट किट तयार केलं आहे. या किटचं ट्रायल घेण्यात आलं असून ते यशस्वी झालं आहे.
अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच झालं नाही तयार शेवटी...; मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/A4XTya65al#Corona#coronavirus#Death
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश
काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार
कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार
बापरे! माकडांमुळे 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी
अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी
...अन् भाजपाच्या नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना फेकून मारली चप्पल, Video व्हायरल