CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:09 PM2020-06-01T14:09:46+5:302020-06-01T14:20:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News kolkata nurse breastfeeds baby after mom cant SSS | CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम

Next

कोलकाता - भारतातील कोरोना व्हायरसचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. रविवारी देशभरात पुन्हा एकदा आठ हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 झाली आहे. तसेच आतापर्यंत देशात 5 हजार 394 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 91 हजार 818 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. याच दरम्यान डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. कोरोनाच्या संकटात काही बाळांचा जन्म होत आहे. मात्र या परिस्थितीत बाळ आणि आई या दोघांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एक महिलेनं बाळाला जन्म दिला मात्र सिझेरियन डिलिव्हरी झाल्यामुळे बाळाला दूध पाजणं शक्य नव्हतं. कोरोनाच्या भीतीने इतरांनीही बाळाला हात लावण्यास नकार दिला. अशावेळी रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने बाळाला दूध पाजल्याची घटना घडली आहे. 

नर्सने काही महिन्यांपूर्वी एका बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे नवजात बाळ भुकेने व्याकूळ झालेलं पाहावलं नाही आणि तिनेच बाळाला दूध पाजण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात याच दरम्यान आणखी काही महिलांची देखील डिलिव्हरी झाली होती. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे बाळाला दूध पाजायला कोणीही तयार झालं नाही. नर्सला 8 महिन्यांचा मुलगा आहे. अशा परिस्थितीतही त्या बाळाला घरी ठेवून आपलं कर्तव्य बजावत आहेत. हायजीन प्रोटोकॉल पाळत नर्सने बाळाला दूध पाजलं. या घटनेनंतर नर्सच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली होती. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली होती. विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? पोलीस ठाण्यात चक्क पोपटांनी साक्ष दिली अन् निर्णयही झाला

CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार

अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक

"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video

 

Web Title: CoronaVirus Marathi News kolkata nurse breastfeeds baby after mom cant SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.