CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:02 PM2020-05-28T16:02:27+5:302020-05-28T16:02:43+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचदरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.
हैदराबाद - भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचदरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.
तेलंगणामधील एका मुलाने आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुमाला लिंगस्वामी असं या 45 वर्षीय मुलाचं नाव असून लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. रोजगार नसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याला पैशांची गरज भासत होती. मात्र पुरेसे पैसे नसल्यामळे त्याने आईला जाळण्याचं भयंकर कृत्य केलं आहे. लिंगस्वामीने आपल्या बहिणींना फोन करुन मी आता आईची काळजी घेऊ शकत नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
CoronaVirus News : भारताच्या शेजारच्या देशांत कोरोनामुळे अशी आहे परिस्थितीhttps://t.co/j9gCtqMHdW#CoronaVirusUpdates#coronavirus#CoronavirusCrisis
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, लिंगस्वामीची आई 65 वर्षीय आई शांतम्मा ही पाच वर्षांपूर्वी पडल्यामुळे त्यांचं हाड मोडलं होतं. त्या अंथरुणावर पडून असायच्या लिंगस्वामी आणि त्याच्या तीन बहिणींनी आईची काळजी घेण्यासाठी एका केयरटेकरची नेमणूक केली होती. मात्र वेळच्या वेळी पैसे मिळत नसल्यामुळे त्यानेही कामावर येणं बंद केलं होतं. शेजारील गावात राहणारी लिंगस्वामीची बहीण आठवड्यातून एकदा येऊन आईला आंघोळ घालण्यापासून सर्व काम करत होती, पण त्याव्यतिरीक्त शांतम्मा या घरात एकट्याच राहत होत्या.
धक्कादायक! विकण्यामागचं कारण ऐकून व्हाल हैराणhttps://t.co/7h4QOOSEHH#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
नालगोंडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक राजेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लिंगस्वामी काही दिवस हैदराबादमध्ये राहिला होता. मजुरांना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लिंगस्वामी आपल्या घरी परतला. मात्र लॉकडाऊन काळात आईची मदत करण्यासाठी बहिणींना येणं शक्य होत नव्हते. पैसे नसल्यामुळे तो काही काळ अस्वस्थ झाला आणि यातूनच टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रिपोर्ट आल्यानंतर प्रशासन हादरलं अन्...https://t.co/zBAxKoWBlK#CoronaUpdatesInIndia#coronavirusinindia#Covid_19india
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र
संतापजनक! हा कसला बाप?... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का
CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला
CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...
CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर