Lockdown : दारूची 'होम डिलिव्हरी' मिळणार; 'या' सरकारनं घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 05:16 PM2020-05-05T17:16:14+5:302020-05-05T17:25:29+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर लांबच लाबं रांगा लागल्या होत्या.

CoronaVirus Marathi News: Liquor will now get 'home delivery'; The decision by the chhattisgarh government rkp | Lockdown : दारूची 'होम डिलिव्हरी' मिळणार; 'या' सरकारनं घेतला निर्णय

Lockdown : दारूची 'होम डिलिव्हरी' मिळणार; 'या' सरकारनं घेतला निर्णय

Next
ठळक मुद्देछत्तीसगड सरकारने राज्यात दारूची होम डिलीव्हरी करण्यास सुरुवात केली आहे.एक ग्राहक एकावेळी 5000 ml पर्यंतच्या दारूची ऑनलाइन ऑर्डर करू शकतो.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर लांबच लाबं रांगा लागल्या होत्या. 

दरम्यान, छत्तीसगडमध्येही दारूची खरेदी करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही गर्दी कमी व्हावी या उद्देशाने छत्तीसगड सरकारने दारूची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड सरकारने राज्यात दारूची होम डिलीव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. एक ग्राहक एकावेळी 5000 ml पर्यंतच्या दारूची ऑनलाइन ऑर्डर करू शकतो. याचे होम डिलिव्हरी शुल्क 120 रुपये असणार आहे. 

दुसरीकडे, पंजाबमधील सरकार सुद्धा दारुची विक्री ऑनलाइन करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर ज्या दुकानांना सकाळी 9 ते एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दारुची दुकाने उघडणास परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दारूची होम डिलिव्हरी केली जाऊ शकते.

दरम्यान, दारू खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा, त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती यामुळे आता दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा विचार दारुची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सुरू आहे.  दारू विक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गेल्या चाळीस दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू असल्याने अर्थव्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे सरकारला मिळणारा महसूलात घट झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, दारू खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सरकारसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

आणखी बातम्या...
संतापजनक! तीन महिलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
WhatsApp Pay या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार?
JEE, NEET परीक्षांची तारीख जाहीर, लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली
 

Web Title: CoronaVirus Marathi News: Liquor will now get 'home delivery'; The decision by the chhattisgarh government rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.