CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 08:39 AM2020-06-10T08:39:38+5:302020-06-10T08:57:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक जण घरीच आहेत. काहींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. तर काहीजण घरबसल्या विविध गोष्टींचा आनंद घेत आहेत.

CoronaVirus Marathi News Lockdown bihar rise in consumption of lpg gas cylinders | CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

Next

बेगूसराय - देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि क्वारंटाईन, चाचण्या यांच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक जण घरीच आहेत. काहींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. तर काहीजण घरबसल्या विविध गोष्टींचा आनंद घेत आहेत. अनेकांनी नवनवीन स्वादिष्ट पदार्थांची सहकुटुंब मेजवानी घेतली आहे. लोक रोज आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत.

कोरोनाचं संकट असताना बिहारच्या बेगूसरायमधील लोकांनी देखील घरबसल्या आपल्या आवडीचे विविध पदार्थ करून लॉकडाऊनच्याकाळात आपली हौस पूर्ण केली आहे. याचाच फायदा घरगुती गॅस सिलिंडरला मोठ्या प्रमाणात झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात LPG विक्रीत कमालीची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. सरासरी वापरापेक्षा सुमारे 40 टक्के अधिक घरगुती गॅसचा वापर या काळात झाला आहे. फक्त बेगूसराय नाही तर बेगूसराय प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या 18 जिल्ह्यांची ही आकडेवारी असल्याची माहिती मिळत आहे.

एप्रिल महिन्याचा विचार करायचा झाला तर एप्रिल 2019 मध्ये 11 लाख गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले होते. तर एप्रिल 2020 मध्ये सुमारे 18 लाख गॅस सिलिंडर वापरण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान लोकांना कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली. यावेळी पुरूषही गृहिणींना घर कामात मदत करत आहेत. ही गृहिणी असलेल्या रंजना कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातून रेडी टू-ईट वस्तू खरेदी करण्यावर जवळपास बंदी होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोक बाहेर शिजवलेले पदार्थ विकत नाहीत, यामुळे घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जात होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 71 लाखांच्या वर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या अनेक व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना व्हायरसचा प्रसार होतो का? याबाबत WHO ने आता खुलासा केला आहे. एसिंप्टोमेटिक म्हणजेच लक्षणं नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

केस कापले, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला अन्...; भयंकर घटनेमागचं धक्कादायक कारण

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

  

Web Title: CoronaVirus Marathi News Lockdown bihar rise in consumption of lpg gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.