CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:00 PM2020-07-28T16:00:21+5:302020-07-28T16:10:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयातील भयंकर प्रकार समोर आला आहे.

CoronaVirus Marathi News man died covid video hospital mismanagement | CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयातील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील एका कोरोना रुग्णाने मृत्यू आधी एक व्हिडीओ केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये रुग्णाने 'कोणीच लक्ष देत नाही, मला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा' असं म्हटलं आहे. कोरोनाग्रस्ताचा हा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रुग्णालयातील निष्काळजीपणाची माहिती स्वत: कोरोनाग्रस्ताने दिली आहे. त्याने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओमध्ये "येथे कोणतीच व्यवस्था नाही, रुग्णांकडे नीट लक्ष दिलं जात नाही. मला दुसऱ्या एखाद्या रुग्णालयात घेऊन जा" असं म्हटलं आहे. यानंतर काही वेळातच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सोशल मीडियावर कोरोना रुग्णाच्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून रुग्णालयातील धक्कादायक वास्तव दिसून येत आहे. तसेच व्हिडीओ शूट करतानाही रुग्णाला प्रचंड त्रास होत होता. मात्र कोणीही वैद्यकीय कर्मचारी त्याच्याजवळ नव्हते. रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील एका कोरोना रुग्णाने मृत्यू आधी एक व्हिडीओ करून तो आपल्या वडिलांना पाठवला होता. त्यामध्ये मुलाने 'बाय डॅडी, त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला आहे, आता मी जगणार नाही' असं म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 64.23%, जगभरात एक कोटी लोकांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट

 

Web Title: CoronaVirus Marathi News man died covid video hospital mismanagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.