बापरे! शाळा सुरू होण्यापूर्वी 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:09 PM2021-01-31T14:09:00+5:302021-01-31T14:18:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चिंताजनक माहिती समोर आली आहे. 

CoronaVirus Marathi News mandi corona infection to school teachers in himachal | बापरे! शाळा सुरू होण्यापूर्वी 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

बापरे! शाळा सुरू होण्यापूर्वी 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल एक कोटीवर गेला आहे. वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चिंताजनक माहिती समोर आली आहे. 

मंडी जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची शनिवारी तपासणी करण्यात आली. त्यावेळी तब्बल 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात शाळा सुरु होणार आहेत. त्याआधी राज्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या तपासणीत किन्नौर जिल्ह्यातील 19 तर बिलासपूर आणि सिमला जिल्ह्यातील 1 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यातील कोरोना पेशंट्सची एकूण संख्या 57424 वर पोहचली आहे. यापैकी 314 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 56131 रुग्ण बरे झाले आहेत. 

हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार 1 फेब्रुवारीपासून सरकारी शाळांमधील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतील. तर डिग्री कॉलेज 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. खासगी शाळांनाही याच कालावधीमध्ये नियमित वर्ग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील सर्व शाळांना वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहणारे विद्यार्थी आणि त्यामधील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी यांचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून खुलासा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. दोन मास्क वापरण्याबाबतते व्हापासून चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय संसर्गजन्य विकार तज्ज्ञ अँथोनी फॉकी यांनी दोन मास्कचा वापर हा कॉमन सेन्सचा भाग असल्याचं म्हटलं आहे. सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं. अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) हा सल्ला औपचारिकपणे लागू केलेला नाही. आरोग्यसंबंधी एका रिसर्च पेपरमध्ये तज्ज्ञ मोनिका गांधी आणि लिनसे मारने यांनी नागरिकांनी किमान उच्च दर्जाचा सर्जिकल मास्क किंवा दाट कधाग्यांपासून बनवलेला मास्क वापरणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title: CoronaVirus Marathi News mandi corona infection to school teachers in himachal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.