CoronaVirus News : जीवघेणा ठरला विवाह सोहळा; नवरदेवाचा मृत्यू अन् तब्बल 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:15 PM2020-06-30T12:15:47+5:302020-06-30T12:33:53+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा सल्ला दिला जात आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या तब्बल 5,66,840 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 16,893 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा सल्ला दिला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. लग्न सोहण्याचं आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे.
कोरोनामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच लग्न समारंभाला हजेरी लावलेले तब्बल 95 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बिहारच्या पाटण्यामध्ये ही घटना घडली. 15 जून रोजी पालिगंजमध्ये एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेली 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हृदयद्रावक! "लेक तापाने फणफणत होता, डॉक्टरांना खूप विनवण्या केल्या पण..."https://t.co/noLv2IRZOr#UttarPradesh#Hospital#DOCTOR
— Lokmat (@MiLOKMAT) June 30, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाचा विवाह होता. तो लग्नासाठी आपल्या गावी आला. त्यावेळीच त्याची तब्येत ठिक नव्हती. मात्र उपचार घेण्याऐवजी धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कोरोनामुळे नवरदेवाचा मृत्यू झाला. लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरुवातीला 15 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर इतर 80 जणांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : "मला श्वास घेणं शक्य नाही.. बाय ऑल, बाय डॅडी"; कोरोनाग्रस्ताचा 'तो' व्हिडीओ ठरला अखेरचाhttps://t.co/2018Vk2RTj#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2020
काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील भिलवाडामध्येही अशीच एक घटना घडली आहे. मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी एका वडिलांना 6,26,600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील एका घरात 13 जून रोजी विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. लग्न समारंभासाठी काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र या लग्नात नियमांचं योग्य रित्या पालन करण्यात आले नाही. समारंभात 50 हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला यामुळेच लग्न समारंभात हजेरी लावल्यानंतर येथील 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला.
बंदीच्या घोषणेनंतर टिकटॉकने मांडली आपली बाजू https://t.co/2OmxD92GMz#TikTok#tiktokbanindia#tiktokban#India
— Lokmat (@MiLOKMAT) June 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं...
...अन् चिमुकल्याच्या मृतदेहाला कवटाळत पित्याचा आक्रोश, मन सुन्न करणारी घटना
विशाखापट्टणम पुन्हा हादरलं! वायू गळतीमुळे दोन जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ
संतापजनक! ई-पास मागितला म्हणून नेत्याची दादागिरी, पोलिसाला केली धक्काबुक्की; Video व्हायरल
काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल
अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...
CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी