CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 08:36 AM2020-07-24T08:36:23+5:302020-07-24T08:39:18+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 63.18 टक्के आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

CoronaVirus Marathi News medical hospital air icu bed patient died | CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची 11 लाख असलेली संख्या केवळ तीन दिवसांतच 12 लाखांहून अधिक झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे 12 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. दुसऱ्या बाजूला दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या संसगार्तून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या आता सात लाख झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की सध्या चार लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 63.18 टक्के आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भागलपूरच्या एका रुग्णालयातील धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका कोरोनाग्रस्ताला त्याच्या नातेवाईकांनी ताज्या हवेसाठी ICUतून बाहेर आणल्याची भयंकर घटना घडली आहे. यामध्ये त्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूरच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालायात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या रूग्णालयात एकूण 800 बेड आहेत. मात्र रुग्णालयात उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. कोरोना रुग्णाला मोकळ्या आणि ताज्या हवेची आवश्यकता आहे असं सांगत एका कुटुंबाने आपल्या रुग्णाला तिसऱ्या मजल्यावरील आयसीयूमधून बाहेर काढले. डॉक्टरांनी याला विरोध केला. पण रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांचं काहीही ऐकलं नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कोरोना रुग्णाला आयसीयू बेड आणि ऑक्सिजन ट्रॉलीसह कुटुंबीय बाहेर नेत होते. यावेळी कुटुंबातील एकाही सदस्याने मास्क लावलेला नव्हता. डॉक्टरांनी मास्क घालण्याच्या सूचना केल्यावर ते धमकी द्यायला लागले. यानंतर रुग्णाला पुन्हा आयसीयूमध्ये आणण्यात येईल असं डॉक्टरांना वाटत होतं. पण आयसीयूमध्ये रुग्ण आढळून न आल्याने डॉक्टरांनी स्थानिक पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली. यामध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

Web Title: CoronaVirus Marathi News medical hospital air icu bed patient died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.