CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 02:31 PM2020-06-04T14:31:48+5:302020-06-04T14:35:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना आसाममध्ये घडली आहे. श्रमिक ट्रेनमधून उडी मारण्यासाठी मजुरांनी एमर्जन्सी चेन खेचल्याची घटना समोर आली आहे.
चेन खेचून मजुरांनी ट्रेनमधून पळ काढल्याने रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ झाला. याप्रकरणी रेल्वे आणि आसाम पोलिसांनी कारवाई करत तब्बल 61 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक श्रमिक ट्रेनने मुंबईहून आले होते. मात्र क्वारंटाईन व्हावं लागू नये यासाठी ट्रेनची चेन खेचून उडी मारुन पळ काढला. मुंबईहून ही ट्रेन आसाम येथील दिब्रुगढ येथे चालली होती. ट्रेन होजाई रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर मजुरांनी चेन खेचण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करत होजाई रेल्वे स्थानकावर उतरलेल्या 56 प्रवाशांना अटक केली. तर काही जणांना आसाम पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने अटक केली आहे.
CoronaVirus News : कोरोनाने नात्यातही दुरावा... आपल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच झालं असं काही...https://t.co/5zCRzFwyhD#CoronavirusInIndia#CoronavirusCrisis#coronaupdatesindia#CoronaUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2020
सर्व मजूर मुंबईहून परतलेले असल्याने घटनेची माहिती मिळताच होजाई रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुंबई करोनाच्या हॉटस्पॉटच्या यादीत असून 40 हजाराहून जास्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून हजारोंच्या संख्येने मजूर आपल्या राज्यात परतत आहेत. काही दिवसांपूर्वी खाद्यपदार्थांच्या पॅकेटसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली होती. मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर ही घटना घडली होती.
CoronaVirus News : लढ्याला यश! देशातील रुग्णांना दिलं जाणार अमेरिकेचं औषधhttps://t.co/sqqu5ZnVi8#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronavirusInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2020
मध्य प्रदेशच्या इटारसी जंक्शनवर सकाळी साधारण आठ वाजता श्रमिक रेल्वे पोहचली. या रेल्वेतील प्रवाशांसाठी काही ब्रेडची पॅकेटस एका ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली होती. जवळपास तीन बोगींमधील प्रवासी खाद्यपदार्थ पाहून स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बोगींमध्ये परत जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी एका प्रवाशाने पॅकेट उचलून पळण्यास सुरुवात केली. इतर प्रवाशांही अशाच पद्धतीने खाद्यपदार्थ पटापट उचलण्यास सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला. पॅकेटवरून प्रवासी आपापसात भिडले आणि स्टेशनवर एकच राडा झाला होता.
CoronaVirus News : संरक्षणासाठी गेले न्यायालयात पण भरावा लागला दंड, 'हे' आहे कारणhttps://t.co/0erKZRatIj#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#Marriage#Court
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...
'या' कंपनीचे तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले; CEO चे पॅकेजही 39 टक्क्यांनी वाढले
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार
Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अॅप नाहीतर...
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग