CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:36 AM2020-05-13T11:36:00+5:302020-05-13T11:44:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: आपल्या गावी जाण्यासाठी एका कुटुंबाने रिक्षाने आपला प्रवास सुरू केला. तब्बल तीन दिवस मुंबई ते युपी असं 1500 किमीचा प्रवास केला. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News migrants travelled 1500 km auto home 200km accident SSS | CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पर्याय वापरून ते आपलं गाव गाठत आहेत. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

आपल्या गावी जाण्यासाठी एका कुटुंबाने रिक्षाने आपला प्रवास सुरू केला. तब्बल तीन दिवस मुंबई ते युपी असं 1500 किमीचा प्रवास केला. मात्र घरापासून काही अंतरावर असतानाच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे घराकडे परतणाऱ्या मजुराच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. 35 वर्षीय राजन यादव हे आपल्या पत्नी आणि मुलांसह सहा महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या रिक्षाने मुंबईहून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी चालले होते. यासाठी त्यांनी तब्बल 1500 किमीचा प्रवास पूर्ण केला. मात्र घरापासून अवघ्या 200 किमी अंतरावर असताना त्यांच्या रिक्षाचा अपघात झाला.

एका ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात राजन यांच्या पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. राजन यादव मुंबईहून रिक्षातून आपल्या कुटुंबाला घेऊन उत्तर प्रदेशकडे निघाले होते. त्यांची पत्नी आणि दोन मुलं तसेच एक पुतण्या असे सर्व रिक्षातून प्रवास करत होते. तसेच त्यांच्यासोबत बाईकवरून त्यांचे आणखी दोन नातेवाईक प्रवास करत होते. मात्र घरापासून अवघ्या 200 किमी अंतरावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर सुदैवाने रिक्षात बसलेले इतर जण बचावले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

लॉकडाऊन दरम्यान काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर येथील पाठा गावाजवळ आंब्याचा ट्रक उलटून अपघात झाला होता. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले. आंब्याचा ट्रकमधून काही जण लपून आपल्या घरी जात होते. याच दरम्यान भीषण अपघात झाला होता. तर त्याआधी कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा तेलंगणातील शमशाबादमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

 

Web Title: CoronaVirus Marathi News migrants travelled 1500 km auto home 200km accident SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.