CoronaVirus News : आनंदाची बातमी; कोरोनाचा सामना करताना देशाला 'या' तीन पायऱ्यांवर मिळत आहे येश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 07:24 PM2020-04-30T19:24:07+5:302020-04-30T19:41:11+5:30
वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढताना देशाच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे. या लढाईत भारताला, कोरोना बाधितांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि डेथ रेट, या तीन महत्वाच्या पायऱ्यांवर यश मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी या तिन्हींचेही वेगवेगळे आकडे समोर ठेवले. यावरून, कोरोना विरोधातील लढाईत भारताला मोठे यश मिळत आहे, हे स्पष्ट होते.
रुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढला -
अग्रवाल म्हणाले, कोरोना बाधितांच्या डबलिंग रेटचा विचार करता, लॉकडाउनपूर्वी देशातील डबलिंग रेट 3.4 दिवस, असा होता. तो वाढून आता 11 दिवस झाला आहे. याहूनही चागली गोष्ट म्हणजे, काही राज्यांचा डबलिंग रेट हा देशाच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. 'दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये 11 ते 20 दिवसांचा डबलिंग रेट आहे. कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळमध्ये कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 20 ते 40 दिवसांपर्यंत आहे. तर आसाम, तेलंगाणा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात हाच रेट 40 दिवसांपेक्षाही अधिक आहे.'
CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत
78 टक्के मृतांमध्ये इतर आजारही -
अग्रवाल म्हणाले, आतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 65 टक्के पुरुष तर 35% महिलांचा समावेश आहे. वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 60-75 वर्षांमधील 42 टक्के, तर 75हून अधिक वय असलेल्या 9.2 टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे मरणारांपैकी 78 टक्के रुग्ण इतर कोणत्याना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. आतापर्यंत एकूण 1,074 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम
रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या 33610 झाली असून यापैकी 24162 अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत. अशा प्रकारे, देशातील रिकव्हरी रेट वाढून 25.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 14 दिवसांपूर्वी रिकव्हरी रेट केवळ 13.06 टक्के होता. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की देशाला रिकव्हरीच्या बाबतीतही यश मिळत आहे.