CoronaVirus News: गोव्यानंतर देशातील 'हे' राज्यही कोरोना मुक्त, ठणठणीत होऊन घरी परतला एकमेव रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 10:28 PM2020-05-09T22:28:30+5:302020-05-09T22:40:53+5:30
एक 50 वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) नेदरलँडला गेले होते. 24 मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
इंफाळ : सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. असे असतानाच, गोव्यानंतर आता देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त झाले आहे. या राज्याचे नाव आहे, मिझोरम, येथे केवळ एकच कोरोनाबाधित व्यक्ती होती. तीही आता ठणठणीत होऊन घरी परतली आहे.
संक्रमित ख्रिश्चन धर्मगुरूला (पाद्री) डिस्चार्ज -
देशातील इशान्येकडील राज्य असलेल्या मिझोरमधील एक 50 वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) नेदरलँडला गेले होते. 24 मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मिझोरमचे आरोग्यमंत्री आर ललथंगलिआना यांनी सांगितले, की गेल्या 24 तासांच्या कालावधीत कोरोना झालेल्या संबंधित धर्मगुरूचे सर्व चारही नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर
आता मिझोरममध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही -
आरोग्यमंत्री म्हणाले,'मिझोरम हे कोरोनामुक्त राज्य म्हणून घोषित केले जाऊ शकते. कारण आमच्याकडे कोरोनाचा आता एकही रुग्ण नाही.' तनावाच्या परिस्थितीत आलेल्या या सकारात्मक बातमीने कोरोना वॉरियर्सचे मनोबल वाढवले आहे.
गोव्याने गेल्या महिन्यातच केला आहे कोरोनाचा पराभव -
यापूर्वी गेल्या महिन्यातच गोवा राज्यानेही कोरोनावर मात केली आहे. येथे एकूण 7 कोरोनाबाधित होते. यातील शेवटचे सॅम्पलही निगेटिव्ह आले आहे. आता गोव्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.
कोरोना आता भारतात वेगाने पसरू लागला आहे. आतापर्यंत देशात 59,662 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 1,981 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17,847 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा