CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या मजुरांची संख्या किती?; मोदी सरकारनं दिली 'धक्कादायक' माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:36 PM2020-05-07T12:36:00+5:302020-05-07T12:42:17+5:30

CoronaVirus marathi News: देशभरात कोट्यवधी मजूर लॉकडाऊनमुळे अडकले

CoronaVirus marathi News modi government dont have numbers about stranded migrant workers reveals rti kkg | CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या मजुरांची संख्या किती?; मोदी सरकारनं दिली 'धक्कादायक' माहिती

CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या मजुरांची संख्या किती?; मोदी सरकारनं दिली 'धक्कादायक' माहिती

Next

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्यानं देशभरात स्थलांतरित मजूर अडकून पडले. या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी सुरू केल्याच्या अनेक घटना देशभरातून समोर आल्या. यातील काही जणांचा जीव गेल्याच्या दुर्दैवी घटनादेखील घडल्या. यानंतर केंद्र सरकारनं श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या. मात्र देशभरात किती मजूर अडकले आहेत, याबद्दलची विचारणा आरटीआयच्या माध्यमातून केल्यानंतर केंद्र सरकारनं धक्कादायक माहिती दिली. अडकलेल्या मजुरांच्या संख्येबद्दल कोणतीही आकडेवारी नसल्याचं उत्तर माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला देण्यात आलं.

देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी त्यांची नेमकी संख्या माहिती असणं गरजेचं आहे. याबद्दल केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्य श्रमायुक्तांनी (सीएलसी) यांनी घाई गडबडीत ८ एप्रिलला एक पत्रक काढलं. देशभरातल्या २० विभागीय श्रमायुक्तांनी (आरएलसी) त्यांच्याकडे असलेल्या संसाधनांचा वापर करुन तीन दिवसांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची संख्या द्यावी, अशी सूचना पत्रकात होती.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची जिल्ह्यावार आणि राज्यवार माहिती एकत्र करण्याच्या दृष्टीनं मुख्य श्रमायुक्तांनी पत्रक काढलं होतं. मात्र स्थानिक श्रमायुक्तांनी याबद्दलची आकडेवारी जमा केली नसल्याचं एका माहिती अधिकारातून समोर आली आहे. कॉमनवेल्थ ह्यूमन राईट एनिशिएटिव्हच्या (सीएचआरआय) व्यंकटेश नायक यांनी अडकलेल्या मजुरांची संख्या जाणून घेण्यासाठी आरटीआयच्या अंतर्गत ४ एप्रिल २०२० रोजी  अर्ज केला. ५ मे २०२० रोजी त्यांनी उत्तर मिळालं. तुम्ही मागितलेल्या माहितीबद्दल आमच्याकडे कोणतीही आकडेवारी नसल्याचं त्यांना केंद्रीय लोक माहिती अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

चला एकत्र केंद्राकडे जाऊ, IFSC मुंबईत आणू; भाजपा नेत्याचं ठाकरे सरकारला आवाहन

अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन

मुंबई अन् पुण्यासह विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना लवकरच गावी पोहोचवणार लालपरी

Web Title: CoronaVirus marathi News modi government dont have numbers about stranded migrant workers reveals rti kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.