CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनातून बरी होऊन डॉक्टर घरी आली; शेजाऱ्यांनी केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:35 PM2020-05-17T15:35:00+5:302020-05-17T15:51:23+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: घरापासून दूर राहून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 47 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. घरापासून दूर राहून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनातून बरी होऊन परतलेल्या डॉक्टरला शेजाऱ्यांनी कुलूप घालून बंद केल्याची घटना घडली आहे.
दिल्लीतील वसंतकुंज परिसरात राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्या बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या होत्या. मात्र घरी आल्यावर त्यांच्याशी शेजाऱ्यांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शेजाऱ्यांनी डॉक्टरला घरात कुलूप लावून डांबून ठेवलं तसेच सोसायटी सोडण्यासाठी धमकीही देण्यात आली. महिला डॉक्टरने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजाऱ्यांनी अचानक आरडाओरड सुरू केला आणि मला शिव्याही दिल्या असं डॉक्टरने तक्रारीत म्हटलं आहे.
CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहितीhttps://t.co/Yv7GnKHQ3t#coronavirus#CoronavirusCrisis
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2020
तुम्हाला कोरोना झाला आहे त्यामुळे तुम्ही आता येथे राहू शकत नाही असं शेजाऱ्यांनी महिला डॉक्टरला सांगितलं. त्यावर डॉक्टरने मी क्वारंटाइन पूर्ण करून आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी राहण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. मात्र तरीही शेजाऱ्यांनी आरडाओरडा बंद केला नाही. बघतोच तू बाहेर कशी निघतेस असं म्हणत घराला बाहेरून कुलुपही लावलं अशी माहिती डॉक्टरने पोलिसांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'हा' रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणारhttps://t.co/T4hIjSyKEs#COVID__19#coronavirus#technology
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2020
Atmanirbhar Bharat Abhiyan : शिक्षण हायटेक होणार; प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल येणारhttps://t.co/AoxWtsZZnl#NirmalaSitharaman#education#AtmaNirbharBharatPackage#AtmaNirbharBharatAbhiyaan#AtmaNirbharDesh
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार
Atmanirbhar Bharat Abhiyan : शिक्षण हायटेक होणार; प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल येणार
CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती
CoronaVirus News : बापमाणूस! रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसाठी तो झाला 'श्रावणबाळ'
फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?
चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव