CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 09:21 AM2020-05-19T09:21:36+5:302020-05-19T09:39:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चने (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे.

CoronaVirus Marathi News new guidelines for corona test SSS | CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी

Next

नवी दिल्ली - भारतातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. 24 मार्चपासून 31 मेपर्यंतचा 69 दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी 5242 रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या लढ्यात ICMRने आपल्या रणनीतीत काही मोठे बदल केले आहेत. 

इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चने (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी नियमामध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. देशातील अन्य राज्यांना कोरोनाने विळखा घातला असून महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्लीतील रुग्णांची संख्या 10,000 वर गेली आहे. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, बिहारचा क्रमांक लागतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील स्थिती गंभीर बनली आहे.

काय आहे बदल?

- ICMRने प्रवासी आणि घरी परतणाऱ्या लोकांमध्ये जर इन्फ्लूएन्झा (ILI)सारख्या आजाराची लक्षणे दिसली तर सात दिवसांच्या आत त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती सोमवारी दिली. 

- एखाद्या रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना किंवा फ्रंट लाईनवर काम करणाऱ्यांमध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या रोगाचे लक्षणे दिसल्यास त्यांची ही आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार.

- एखाद्या संक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आणि अत्यत गंभीर परिस्थिती राहणाऱ्यांना, ज्यांना लक्षणं दिसत नाहीत, यांच्यावर संपर्कात आल्यानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवसाच्या दरम्यान तपासणी केली जाईल. आतापर्यंत अशा प्रकरणांची पाचव्या आणि 14 व्या दिवसादरम्यान एकदा चौकशी केली जात आहे.

ICMRने देशात वाढणारी कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता आपल्या रणनीतीमध्ये काही बदल केले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण आणि प्रसार रोखणे हा नव्या रणनीतीचा उद्देश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनातून बरी होऊन डॉक्टर घरी आली; शेजाऱ्यांनी केलं असं काही...

CoronaVirus News : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?

CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार

CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : बापमाणूस! रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसाठी तो झाला 'श्रावणबाळ'

फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?

चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव

Web Title: CoronaVirus Marathi News new guidelines for corona test SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.