CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 11:04 AM2020-05-31T11:04:42+5:302020-05-31T11:05:31+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 61 लाखांच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आले असून यामध्ये तीन टप्प्यांत सूट देण्य़ात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 8,380 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5164 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (31 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 8,380 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक लाख 80 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे.
Highest spike of 8,380 new #COVID19 cases in the last 24 hours in India, 193 deaths reported. Total number of cases in the country now at 1,82,143 including 89995 active cases, 86984 cured/discharged/migrated and 5164 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/CfNY1DVBtC
— ANI (@ANI) May 31, 2020
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 89995 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 86984 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या वर पोहोचला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
CoronaVirus News : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्याhttps://t.co/uICtkDNo20#CoronaUpdatesInIndia#coronavirusinindia#ICMRFIGHTSCOVID19#ICMR#Hydroxycloroquine
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा वापर थांबवला आहे. मात्र भारतात याचा वापर सुरू आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या संदर्भात WHO ला एक पत्र लिहिलं आहे. भारतात या औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम दिसून आलं नसल्याचं यामध्ये म्हटलं आहे.
CoronaVirus News : "राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे" https://t.co/XpvRqfjlMy#CoronaInMaharashtra#CoronaWarriors#RohitPawar@RohitPawarSpeak
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र
CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान
CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी
धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ
चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक