CoronaVirus News: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २३,६५१, तर ८३२४ रुग्णांना मिळालाय 'डिस्चार्ज'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:08 AM2020-04-30T10:08:08+5:302020-04-30T10:27:52+5:30
देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे
मुंबई - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून येते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये ३ मे नंतरही लॉकडाऊन कायम राहिल, असे दिसून येत आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ६५१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा ९९५१ वर पोहोचला आहे. देशातील २३,६५१ रुग्णांपैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तर, या संख्येतील एक रुग्ण स्थलांतरीत आहे. देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १०७४ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गुरुवार ३० एप्रिल सकाळी ०८ वाजेपर्यंतची ही माहिती आहे. याबाबत, महाराष्ट्र परिचय केंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.
देशातील #कोरोनावायरस ची आजची स्थिती@MoHFW_INDIA ची आज सकाळी ८ वाजेपर्यंतची आकडेवारी.#coronaupdatesindia#IndiaFightsCorona#StayHomeIndia#StayHomepic.twitter.com/sqzSDwDq24
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) April 30, 2020
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश मॉडेलचा विचार करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनं राज्यातल्या सर्व जनतेची तपासणी केली. शरीरात शीतज्वराची लक्षणं असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झालेल्या व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. याच मॉडेलचा वापर करण्याची सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केल्याचं वृत्त 'द इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे.