CoronaVirus News: दिलासादायक! देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 27, 2020 09:02 PM2020-09-27T21:02:40+5:302020-09-27T21:17:58+5:30

मंत्रालयाने म्हटले आहे, की 21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

CoronaVirus Marathi News number of patients recovering from corona virus reached to 50 lakhs in the country | CoronaVirus News: दिलासादायक! देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण

CoronaVirus News: दिलासादायक! देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण

Next
ठळक मुद्दे21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

नवी दिल्ली - देशभरात गेल्या 24 तासांत 92,043 रुग्ण बरे झाले आहेत. याच बरोबर आता देशात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास 50 लाखपर्यंत गेली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले, आता उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या 90 हजारहून अधिक आहे.

मंत्रालयाने रविवार सकाळी आठ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 92 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर याच काळात तब्बल 86,000 नवे रुग्ण समोर आले आहेत. मंत्रालयने म्हटले आहे, ‘‘बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीबरोबरच, आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 82.46 टक्क्यांवर पोहोचला आहे.’’

SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

येथे नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक -
मंत्रालयाने म्हटले आहे, की 21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत बऱ्या होणाऱ्या रुग्णांत 76 टक्के रुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, दिल्ली, छत्तीसगड, केरळ आणि पश्चिम बंगाल, या दहा राज्यांतील आहेत.

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण बरे -
मंत्रालयाने म्हटले आहे, बऱ्या झालेल्या रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र सर्वात वरच्या स्थानावर आहे. येथे गेल्या 24 तासांत 23 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 9,000 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. भारतात नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या सुग्णांची संख्या अधिका आहे. देशात उपचार घेत असलेले रुग्ण आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांत जवळपास 40 लाखांचे (39,85,225) अंतर आहे. एवढेच नाही, तर ‘‘देशात गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमीच आहे. एकूण रुग्णांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15.96 टक्के एवढी आहे,’’ असेही मंत्रालयाने सांगितले.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

Web Title: CoronaVirus Marathi News number of patients recovering from corona virus reached to 50 lakhs in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.