CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 01:50 PM2020-07-27T13:50:31+5:302020-07-27T14:01:38+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News nurse who distributes free supplies people of village | CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

Next

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. अशीच एक नर्स जंगलातून जाऊन रुग्णांचा जीव वाचवता यावा यासाठी मोफत औषधं देत आहे. मुदगली तिर्की असं या 55 वर्षीय नर्सचं नाव असून त्या अनेक वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्या गावकऱ्यांना मदत करत आहे. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील सूर गावात त्या कार्यरत आहेत. लोकांपर्यंत औषध पोहचवता यावीत यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.

कोरोनाच्या संकटातही त्या जंगलातून पायी अंतर पार करत गावोगावी जात आहेत. तेथील लोकांना आवश्यक असलेली सर्व मदत करत आहेत. फक्त औषधंच नाही तर इतरही अनेक जीवनावश्यक वस्तू त्या गावकऱ्यांना देत आहेत. तसेच त्यांच्या या कार्यात त्यांचे काही कर्मचारीदेखील त्यांच्यासोबत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गावातील अनेक आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेलं जातं तसेच काही महिलांची डिलेव्हरी देखील मुदगली तिर्की यांनी केली आहे. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला अनेकांनी सलाम केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांचा आकडा 14 लाखांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या धक्कादायक आकडेवारीने चिंता वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14,35,453 वर गेली आहे तर आतापर्यंत देशभरात तब्बल 32,771 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,931 नवे रुग्ण आढळून आले असून 708 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संदर्भात विविध ठिकाणी संशोधन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ

CoronaVirus News : "Covid रिपोर्टिंगमध्ये उत्तर प्रदेश, बिहारची कामगिरी सर्वात वाईट"; रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : लय भारी! PPE किट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण; अनोख्या लग्नाचा Video तुफान व्हायरल

रुग्णालयातील धक्कादायक वास्तव! नवजात बाळ ट्रेमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर अन् 'ते' शोधत होते डॉक्टर पण...

CoronaVirus News : हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करता?; वेळीच व्हा सावध, आरोग्य मंत्रालयाने दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर


 

Web Title: CoronaVirus Marathi News nurse who distributes free supplies people of village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.