CoronaVirus News: कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:08 PM2020-05-19T15:08:53+5:302020-05-19T15:12:43+5:30
या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार की नाही, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केलेल्या कामांसदर्भात, तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसोबत होत असलेल्या वर्तनासंदर्भात चर्चा होईल, असे मानले जात आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वबूमीवर विरोधकांनी एक बौठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची ही बैठक शुक्रवारी दुपारी 3 वाजता होईल. या बैठकीत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, डीएमके नेते एमके स्टालिन यांच्यासह 15 राजकीय पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.
काँग्रेस भाग घेणार की नाही? अद्याप अस्पष्ट -
या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार की नाही, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केलेल्या कामांसदर्भात, तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसोबत होत असलेल्या वर्तनासंदर्भात चर्चा होईल, असे मानले जात आहे.
CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा
ममतांनी केला होता भेदभाव करत असल्याचा आरोप -
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या, अशा काळात केंद्राने राजकारण करायला नको. राज्य कोरोनाचा चांगल्या प्रकारे सामना करत आहे. पश्चिम बंगालला लागूनच आंतरराष्ट्रीय सीमाही आहे, हेही केंद्राला समजायला हवे.
उद्धव ठाकरेंनी केला होता 'असा' आरोप -
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केंद्रावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, 'आम्ही केंद्राकडे दाळ मागितली, कारण आम्ही अंन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लोकांना धांन्य वाटप करतो, मात्र, आमच्याकडे केवळ तांदुळच आहेत. यामुळेच आम्ही दाळ आणि गव्हाची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही ते आम्हाला मिळालेले नाही. मला वाटते, 'दाल में कुछ काला है' पण दाळ तर येऊ द्या.
'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी
या सर्व मुद्यांवर, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांचे नेते आपली रणनीती तयार करतील, असे मणले जात आहे. एवढेच नाही, तर राज्यांनी केंद्राकडे मागीतलेल्या मदत निधीवरही, या बैठकीत चर्चा होऊ शकते. अद्याप केंद्राकडून राज्यांसाठी मदत निधीची घोषणा करण्यात आलेली नाही.
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप