CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:48 PM2020-06-27T15:48:15+5:302020-06-27T15:57:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: . देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा तीन टक्के आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 18,552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 1,97,387 रुग्ण उपचार घेत आहेत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,08,953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15,685 झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 58 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी (27 जून) याबाबतची माहिती दिली आहे. तसेच जवळपास तीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा तीन टक्के आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा 19 दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण 3 दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
Our recovery rate has gone above 58% and around 3 lakh people have recovered from #COVID19. Our mortality/fatality rate is near 3% which is very less. Our doubling rate has come down to near 19 days, which was 3 days before the lockdown: Union Health Minister Dr Harsh Vardhan https://t.co/IzcrOuyxo8pic.twitter.com/URziBpE3Zo
— ANI (@ANI) June 27, 2020
हर्षवर्धन यांनी देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. भारतासाठी ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. 30 जानेवारीला देशात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या 1 लाखावर गेली होती. यानंतर कोरोनाच्या संक्रमणाचा वेग एवढा वाढला की, केवळ 15 दिवसांतच हा आकडा दोन लाखावर गेला. यानंतर हा आकडा तीन लाख होण्यासाठी 10 दिवस लागले. हा वेग आणखी वाढून 4 लाखांवर हा आकडा जाण्यासाठी 8 दिवस लागले. तर चार लाखांवरून पाच लाखांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 6 दिवसांचा कालावधी लागला आहे.
CoronaVirus News : जगभरात कोरोनावरील औषध आणि लसीसाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. मात्र लसीबाबत बिल गेट्स म्हणतात...https://t.co/Jci1RA6Jc2#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#BillGates
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2020
पाच लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी भारताला 149 दिवस लागले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाचा वेग कमी आहे. अमेरिकेमध्ये सर्वात वेगाने प्रसार झाला होता. केवळ 82 दिवसांत अमेरिकेमध्ये पाच लाखांचा टप्पा ओलांडला होता. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 99 लाखांवर गेली आहे. तर आतापर्यंत 4 लाख 96 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
CoronaVirus News : राज ठाकरेंच्या घरात काम करणारे दोन जण कोरोना पॉझिटिव्ह https://t.co/ej1IfZzRrD#CoronaUpdates#CoronavirusIndia#RajThackeray#Mumbai#MNS
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण
CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण
Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल
CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा
घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं
CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य