CoronaVirus News : श्रद्धा की अंधश्रद्धा? ...म्हणून 'या' नदीत लोक रोज टाकताहेत तब्बल 500 किलो बर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:58 PM2020-06-17T14:58:32+5:302020-06-17T14:58:48+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: काही लोक दररोज नदीमध्ये 500 किलो बर्फ टाकत. गेले काही दिवस त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.
सूरत - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन आणि मास्कच्या मदतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान काही अजब घटना समोर येत आहेत. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी सूरतमधील काही लोक हे तापी नदीत बर्फ टाकत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सूरत हे शहर तापी नदीच्या काठावर वसलेलं आहे. येथील लोक हे तापी नदीला आपली आई मानतात. बाहेरून रोजगारासाठी सूरतमध्ये आल्यानंतर तापीच्या आशीर्वादामुळेच प्रगती झाल्याची त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळेच त्यांनी तापी नदीला कोरोना व्हायरसचं संकट दूर करण्यासाठी थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी ते दररोज नदीत बर्फ टाकत आहेत.
CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,54,065 वरhttps://t.co/IDNCJf9iQU#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2020
तापीत बर्फ टाकून पाणी थंड केलं तर कोरोना व्हायरसचा प्रकोप होणार नाही अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यासाठी काही लोक दररोज नदीमध्ये 500 किलो बर्फ टाकत. गेले काही दिवस त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. तर काहींनी हे अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये गुजरातमध्ये 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1506 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : प्रशासनाची चिंता वाढवणारं नेमकं घडलं तरी काय? https://t.co/ziRChFX6dG#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2020
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे 11903 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,54,065 वर पोहोचली आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात तंत्रज्ञानाची कमालhttps://t.co/f4Kqkl9b3z#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#technology
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात
एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी