CoronaVirus News: आम्ही कोरोनाचा सामना करत आहोत अन् ते दहशतवादी व्हायरस परसवत आहेत - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:17 PM2020-05-04T23:17:10+5:302020-05-04T23:29:31+5:30

'एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे. 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे.

CoronaVirus Marathi News pm modi attended nam summit on coronavirus via video conferencing sna | CoronaVirus News: आम्ही कोरोनाचा सामना करत आहोत अन् ते दहशतवादी व्हायरस परसवत आहेत - मोदी

CoronaVirus News: आम्ही कोरोनाचा सामना करत आहोत अन् ते दहशतवादी व्हायरस परसवत आहेत - मोदी

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्याच्या पद्धतींसंदर्भात आज नॉन अलायन मुव्हमेंटची बैठक पार पडलीयावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील पंतप्रधानांसोबत या बैठकीत सहभागी झाले होतेपंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्याच्या पद्धतींसंदर्भात झालेल्या नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM)  वर्चुअल समिटमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील पंतप्रधानांसोबत या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जगातील अनेक देशांशी चर्चा करताना पाकिस्तानवरही प्रहार केला. 'देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र काही लोक असेही आहेत, जे दहशतवादाचा व्हायरस परसवत आहेत, असे मोदी म्हणाले.

कोरोनानंतर अमेरिकेवर आता जीवघेण्या 'मर्डर हार्नेट्स'ची दहशत, घेऊ शकतो अनेकांचा बळी

'एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे. 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे. लोकांनी घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग केला तर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते, असेही मोदी म्हणाले.
 
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पार पडलेल्या या शिखर संमेलनात बोलताना मोदी म्हणाले, "जग भलेही कोरोना व्हायरचा सामना करत आहे. मात्र, काही लोक दहशतवाद, फेक न्यूज आणि समाजाला फोडण्यासाठी व्हिडिओसारखे काही घातक व्हायरस पसरवत आहेत. भारतीय सभ्यता ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानते. आम्ही आपल्या नागरिकांची देखभाल करतानाच इतर देशांनाही मदत करत आहोत." 

CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

भारत करतोय जगाला मदत -
कोरोनाचा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या देशांशी समन्वय साधण्यास महत्व दिले. अम्ही अनेक देशांशी भारतीय वैद्यकीय कौशल्यावर ऑनलाइन ट्रेनिंगदेखील सुरू केली आहे. आम्हाला गरज असतानाही आम्ही 123 हून अधिक भागीदारी असलेल्या देशांना वैद्यकीय पुरवठा निश्चित केला आहे, असेही मोदी म्हणाले.

CoronaVirus News : पुतीन यांच्यावर टीका केली, की दुसऱ्याच दिवशी छतावरून पडतात डॉक्टर

Web Title: CoronaVirus Marathi News pm modi attended nam summit on coronavirus via video conferencing sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.