CoronaVirus : कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी घेतली मोठी बैठक, लशीसंदर्भात म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 08:19 PM2020-10-15T20:19:42+5:302020-10-15T20:26:08+5:30
कोरोना लशीसंदर्भात बोलताना, सरकार कमी किमतीत सर्वांना लशीचा पुरवठा करण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही मोदींनी म्हणाले. यावेळी त्यांनी लस तयार करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचीही प्रशंसा केली. (Narendra Modi)
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना टेस्ट आणि सीरो सर्व्हे आणखी वाढविण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वांना कमी किमतीत आणि नियमितपणे तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना लशीसंदर्भात बोलताना, सरकार कमी किमतीत सर्वांना लशीचा पुरवठा करण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही मोदींनी म्हणाले. यावेळी त्यांनी लस तयार करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचीही प्रशंसा केली.
कमी किमतीत उपचार देण्यास कटिबद्ध -
मोदी म्हणाले, देश सहजपणे सर्वांसाठी कमी किमतीत कोरोना तपासणी, लस आणि उपचार देण्यास कटिबद्ध आहे. यावेळी, कोरोना व्हायरस महामारीविरोधातील लढाईवर सातत्यावे लक्ष ठेवण्याचे आणि उच्च स्तरीय तयारी ठेवण्याचे आवाहन करत, पंतप्रधान मोदी यांनी हेल्थ अथॉरिटीजला कोरोना टेस्ट आणि सीरो सर्व्हे वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
"थंडीच्या दिवसांत आणखी वेगाने पसरणार कोरोना, 6 फुटांचं अंतरही ठरेल कुचकामी!"
कोरोनासंदर्भातील संशोधन आणि लस तयार करण्याच्या कामासंदर्भातील आढावा बैठकीत, वैज्ञानिक संशोधनाबरोबरच पारंपरिक उपचार पद्धतीचे महत्व, यावरही मोदींनी भाष्य केले.
पंतप्रधान मोदींनी या कठीन परिस्थितीत आयुष मंत्रालयाच्या वतीने, पुराव्यांवर आधारित संशोधन आणि विश्वसनीय समाधान उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली. या बैठकीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), प्रिंसिपल सायंटिफिक अॅडव्हायझर, अनेक वरिष्ठ वैज्ञानिक आणि इतर काही अधिकारीही उपस्थित होते.
कोरोनाचं अजून एक भयानक रूप माणसांमध्ये फैलावण्याचा धोका, चिंता वाढवणारी माहिती समोर
कोरोनाचा सामना करण्यासाठी इंडियन व्हॅक्सीन डिव्हलपर्स आणि निर्मात्यांचेही मोदींनी कौतुक केले. तसेच, यासंदर्भातील सर्व प्रयत्नांत सरकार सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी लशीच्या वितरणासंदर्भातील व्यापक तयारी संदर्भातही माहिती दिली.