CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:35 AM2020-05-15T08:35:10+5:302020-05-15T08:39:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: पंतप्रधान मोदी यांनी बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. कोरोनाच्या या लढाईतील समस्या आणि आजाराशी लढण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना यावर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला असून अनेक देश त्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारताला यश आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्याने त्यांचं कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मोदींना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून त्यांनी मोदींचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा केली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. मात्र याच दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत असून रुग्णांची संख्या ही 80 हजारांच्या वर गेली आहे. तर 2400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी (14 मे) बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. कोरोनाच्या या लढाईतील समस्या आणि आजाराशी लढण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना यावर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तसेच पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात भारताने केलेल्या उपाययोजनांचीही बिल गेट्स यांना माहिती दिली. कोरोनाची ही लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
PM underlined the conscious approach that India has adopted in its fight against the health crisis-an approach based on ensuring public engagement through appropriate messaging: PMO. #COVID19pic.twitter.com/vWDQVKyh4P
— ANI (@ANI) May 14, 2020
'भारत आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीने कोरोनाविरोधातील ही लढाई लढत आहे. कोरोनाशी संबंधित सर्व माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. याचा लाभ जगभरातील अन्य देशही घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे' असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच 'स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेबाबत पहिल्यापासूनच जागरूक केलं जात होतं. कोरोनाच्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. या लढ्यात गेट्स फाऊंडेशन भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत आहे, हे खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे' असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणारhttps://t.co/Lzz94yNVQ3#coronavirus#CoronaUpdatesInIndia#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2020
Coronavirus : अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा सुरू करता येतील; बिल गेट्स यांनी दिले 'हे' मोलाचे सल्ले
कोरोनावर मात करुन अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करायची असेल तर काय करायला हवं याबाबत काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांनी मोलाचा सल्ला दिला होता. बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमधून अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या विचारात असणाऱ्या सर्व देशांना काही सल्ले दिले. कोरोनाविरुद्धच्या लढाईची तुलना बिल गेट्स यांनी महायुद्धाशी केली असून या लढाईमध्ये सर्व देश एकाच बाजूने असल्याचं म्हटलं होतं. तसेच कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भात नव्या पद्धतीने विचार करणे, लस शोधणे आणि सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांच्या जोरावरच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल असंही त्यांनी नमूद केलं होतं.
CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!https://t.co/mRcyrMcqdv#coronavirus#CoronaInMaharashtra@MumbaiPolice
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल
CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार
CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!
CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण