CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 09:45 AM2020-06-14T09:45:46+5:302020-06-14T10:19:12+5:30
सध्या देशात कोरोना केसेस वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत अधिकारी म्हणाले, जर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांचा असता, तर आतापर्यंत देशात 10 लाक रुग्ण झाले असते. या रुग्णांमध्ये गुणाकार होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, आता केंद्र सरकार राज्यांसह एकत्रितपणे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अधिक सुधारणा करणार आहे. पुढील दोन महिन्यात संपूर्ण देशातच मनसून पोहोचलेला असेल. तेव्हा ज्या शहरांमध्ये अधिक कोरोनाबाधित आहेत अथवा शेकडो हॉटस्पॉट्स आहेत, अशा शहरांवर प्रामुख्याने लक्ष राहील. हा निर्णय शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या समीक्षा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्यावरील उपचार आणि व्यवस्थापण अधिक चांगले कसे करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली.
भारता अमेरिका होऊ द्यायचे नाही -
देशातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. हा वेग असाच वाढत राहिला, तर भारताची स्थिती अमेरिकेसारखी, किंबहूना त्याहूनही विदारक व्हायला वेळ लागणार नाही. भारतावर अमेरिकेसारखी परिस्थिती कोसळू नये यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि कन्टेंमेन्ट स्ट्रॅटजी अधिक प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता आहे. या समीक्षा बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अनेक शक्यतांवर चर्चा करण्यात आली. मार्च महिन्यानंतर टेस्टिंग आणि डेडिकेटेड कोरोना रग्णालयांची संख्या वाढली आहे. मात्र, ते पुरेसे नाही.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
कोरोनाबाधितांच्या रोजच्या संख्येत वाढ होऊ नये यावर लक्ष -
सध्या देशात कोरोना केसेस वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत अधिकारी म्हणाले, जर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांचा असता, तर आतापर्यंत देशात 10 लाक रुग्ण झाले असते. या रुग्णांमध्ये गुणाकार होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी नीती आयोगाचे सदस्य आणि मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेन्ट प्लॅनच्या ग्रुपचे, विनोद पॉल यांनी सध्याची स्थिती आणि संभाव्य स्थितीसंदर्भात सविस्तर प्रेझेन्टेशन केले.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
पाच राज्यांतच दोन तृतियांश कोरोनाबाधित -
पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे, की "एकूण कोरोनाबाधितांपैकी दोन तृतियांश कोरोनाबाधित पाच राज्यांतच आहेत आणि तेही विशेषतः मोठ्या शहरांत. यावेळी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता बेड्सची संख्या आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासंदर्भात चर्चा झाली." पंतप्रधानांनी शहर आणि जिल्यांतील रुग्णालये आणि आयसोलेशन बेड्सच्या आवश्यकतेसंदर्भातही जाणून घेतले. त्यांनी आरोग्य मंत्रालयाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एकत्रितपणे पुढील नियोजन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक -
भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीसह विविध राज्यांमध्ये कोरोना साथीची स्थिती कशी आहे, प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध किती प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत, किती उद्योगधंदे सुरू झाले, अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत घेतली.