CoronaVirus News : कौतुकास्पद! पुराच्या पाण्यात होडी झाली रुग्णवाहिका, पोलिसांनी केली रुग्णांसाठी व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 09:46 AM2020-08-24T09:46:26+5:302020-08-24T09:49:54+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: मुसळधार पाऊस पडत असून नद्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत लोकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यात पावसाने थैमान घातले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून नद्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत लोकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र पोलीस आणि वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना मदत करण्यासाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. पोलिसांनी रुग्णाला रुग्णालयात सुखरूपरित्या नेण्यासाठी पुराच्या पाण्यात होडीला रुग्णवाहिका केली आहे. रुग्णासाठी पोलिसांनी केलेल्या या कार्याचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच पोलीस रुग्णाला होडीतून घेऊन जाताना दिसत आहेत.
#WATCH Andhra Pradesh: Police in Doddavaram village of East Godavari district used a boat to take a #COVID19 patient to hospital, as the village is flooded following rainfall in the region. The boat was arranged by a Sub-Inspector of Nagaram village of the district. (23.08.2020) pic.twitter.com/g5aiOeFM5p
— ANI (@ANI) August 23, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील डोड्डावरम या गावामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणं अशक्य झालं होतं. यावेळी पोलिसांनी चक्क होडीची रुग्णवाहिका करून रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरूhttps://t.co/9TWMl36Z0F#coronavirus#CoronaUpdates#CoronaVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020
काही दिवसांपूर्वी कडनाई गावातील महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. मात्र रस्त्यांअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी कावड केली आणि महिलेला टोपलीत बसवून नेले. रुग्णवाहिका नसल्याने गर्भवती महिलेला नदी पार करून काही गावकऱ्यांनी रुग्णालयात नेल्याची घटना घडली होती. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात ही घटना घडली होती.
CoronaVirus News : तुम्हाला कोरोना लसीची चाचणी करायची असल्यास 'या' गोष्टी आहेत महत्त्वाच्याhttps://t.co/fA06WGUsE4#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी
'दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा', रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी
CoronaVirus News : स्वत:वर कोरोना लसीची चाचणी करायचीय?, 'या' आहेत अटी, जाणून घ्या नेमकं कसं असणार?
Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; भाजपा कार्यकारणीशी साधला संवाद