CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:42 AM2020-06-12T08:42:33+5:302020-06-12T08:43:23+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने खासगी लॅब्सना देखील कोरोना चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या लॅब रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचं उघड झालं आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये खासगी लॅब्सने तब्बल 35 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं आता स्पष्ट झालं. या घटनेने खासगी लॅबचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र या दरम्यान निगेटिव्ह लोकांना तीन दिवस कोरोना रुग्णांसोबत आयसोलेशन वॉर्डमध्ये राहावे लागल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
CoronaVirus News : भीतीदायक! कोरोनाचं संकट आणखी गडद होतंय...https://t.co/QmgwcfWIKU#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील काही लोकांना ताप, सर्दी असा त्रास होत होता. डॉक्टरांकडे गेले असता त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला गेला. खासगी लॅब्समध्ये चाचणी केली असता 35 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. मात्र सरकारी लॅबमध्ये पुन्हा एकदा चाचणी गेली असता ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. हा संतापजनक प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित लॅब्सना नोटीस पाठवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत मांजरींच्या औषधाची कमालhttps://t.co/QkghuWp8U9#CoronavirusCrisis#CoronaVirus#CoronaUpdate
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येबाबत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनमध्ये ही संख्या 2 लाख 90 हजारांपेक्षा जास्त आहे तर सहाव्या क्रमांकावरील भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 2 लाख 86 हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत ब्रिटनला मागे टाकण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता. त्यानंतर शंभर दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेली. त्यापुढील पंधरवड्यात आणखी एक लाख रुग्ण वाढले.
'त्या' व्हायरल मेसेजमागचं जाणून घ्या सत्य https://t.co/tA6t6eb5vb
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?
देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?
CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!
CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च