CoronaVirus News: कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होणार?; रघुराम राजन यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:30 AM2020-04-30T10:30:57+5:302020-04-30T10:40:10+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates कोरोनानंतरच्या आर्थिक आव्हानांवर रघुराम राजन यांचं भाष्य

CoronaVirus Marathi News raghuram rajan speaks about challenges in front of indian economy kkg | CoronaVirus News: कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होणार?; रघुराम राजन यांची मोठी भविष्यवाणी

CoronaVirus News: कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं काय होणार?; रघुराम राजन यांची मोठी भविष्यवाणी

Next

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आधीच मंदीसदृश्य स्थितीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेसमोर लॉकडाऊनमुळे आणखी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. लॉकडाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या असून त्यांच्यासाठी सरकारला ६५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असं राजन म्हणाले.

कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. त्यावर रघुराम राजन यांनी भाष्य केलं. कोरोनानंतर भारत जागतिक पातळीवर एक मोठी भूमिका बजावू शकतो. कोरोनाचं संकट संपल्यानंतर जगात मोठे बदल होतील. त्यामध्ये भारत आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी आपण आपले प्राधान्यक्रम निश्चित करायला हवेत. आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात, असं राजन यांनी सांगितलं. 

संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. संपूर्ण जगासाठी ही मोठी आपत्ती आहे. मात्र संकटातही संधी असू शकते. कोरोनानंतर काही देशांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. उद्योग, पुरवठा साखळीत भारताला बराच वाव आहे. मात्र त्याआधी लॉकडाऊन संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. लॉकडाऊन संपवायचा असल्यास आपल्याला दररोज २० लाख चाचण्या घ्याव्या लागतील. अमेरिकेपेक्षा चौपट चाचण्या करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधलं.

आपल्याकडे आयुष्य उत्तमपणे जगण्याची शैली आहे. आरोग्य, शिक्षणावर अनेक राज्यांनी चांगलं काम केलं आहे. मात्र मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गासमोरील आव्हानं मोठी आहेत. कोरोनाच्या संकटानंतर या वर्गाकडे चांगल्या नोकऱ्या नसतील. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ सरकारी नोकऱ्या पर्याय असू शकत नाही, अशा शब्दांमध्ये राजन यांनी कोरोनानंतरची आव्हान सांगितली.

रेड, ऑरेंज झोनसाठी आता 'हिमाचल मॉडेल'; मोदींच्या सर्व राज्यांना सूचना

भाजपाचे सगळे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत; जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

Web Title: CoronaVirus Marathi News raghuram rajan speaks about challenges in front of indian economy kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.