CoronaVirus News: कृषी भवनात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, अन्न पुरवठा मंत्रालय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:34 PM2020-05-19T23:34:18+5:302020-05-19T23:40:22+5:30
एका अधिकृत निवेदनानुसार, 'मंगळवारपासून भवनाच्या सॅनिटाइझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम बुधवारपर्यंत चालेल. तोपर्यंत कृषी भवनाचा हा भाग सील राहील.'
नवी दिल्ली : नीती आयोग आणि शास्त्री भवनानंतर कोरोना व्हायरस आता कृषि भवनातही पोहोचला आहे. येथील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे कार्यालय आणि अन्न पुरवठा मंत्रालयदेखील सील करण्यात आले आहे. कृषी भवनाचा हा भाग बुधवारपर्यंत पूर्णपणे सॅनिटाइझ केला जाईल.
नवी दिल्ली येथील राजपथवर असलेल्या कृषि भवनात अन्न पुरवठा त्रालयासोबतच कृषि, ग्रामीण विकास आणि पंचायतीराज विभागाची कार्यालयेही आहेत. मत्स्य, पशुपालन व डेरी विभागाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यानंतर कृषी भवनातील अन्न व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे कार्यालय आणि मंत्रालयाचा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती
एका अधिकृत निवेदनानुसार, 'मंगळवारपासून भवनाच्या सॅनिटाइझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम बुधवारपर्यंत चालेल. तोपर्यंत कृषी भवनाचा हा भाग सील राहील.'
नीती आयोगाचे कार्यालयही सील -
यापूर्वी, कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर 28 एप्रिलपासून नीति आयोगाचे कार्यालयही बंद करण्यात आले आहे. तर पाच मेपासून शास्त्री भवनाचा एक मजलाही सील करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये ढील देणं दिल्लीला पडलं महागात -
राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी लॉकडाऊनमधून नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू केली आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. मात्र, या सवलतीमुळे दिल्लीत 24 तासांत 500 नवे रुग्ण सापडले आहेत.
'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी
देशात कोरोना बाधितांची संख्या एकलाखवर
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वेबसाइटनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1,01,139 वर पोहोचली आहे. यात 39173 लोक उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. देशाज जवळपास 58802 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. तर आतापर्यंत 3163 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाचा फैलाव झालेले अन्य युरोपीय देश आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारतातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दरही कमी आहे.