दिलासादायक! देशात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्ण घटले, 24 तसांत तब्बल 11 हजार जण ठणठणीत होऊन घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 03:59 PM2020-05-30T15:59:12+5:302020-05-30T16:10:28+5:30
देशात शनिवारी सकाळपर्यंत एका दिलवसात 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 7,964 नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4,971वर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत विक्रमी 7,964 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. मात्र, आजची दिलासादायक बाब म्हणजे, आज तब्बल 11,264 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. यामुळे पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. आता देशभरात 86,422 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या शुक्रवारी 89,987 एवढी होती.
देशाचा रिकव्हरी रेट वाढला -
देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट वाढला आहे. हा रिकव्हरी रेट आता 47.40पर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 1,73,763 कोरोनाबाधित समोर आले आहेत. त्यापैकी 86,422 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 82,370 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन
एका दिवसात सर्वाधिक रुग्ण -
देशात शनिवारी सकाळपर्यंत एका दिलवसात 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 7,964 नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4,971वर पोहोचला आहे.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू -
कोरोनामुळे देशभरात 4,971 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 2,098 जण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यानंतर गुजरातमध्ये 980, दिल्लीमध्ये 398, मध्य प्रदेशात 334, पश्चिम बंगालमध्ये 302, उत्तर प्रदेशात 198, राजस्थानात 184, तामिलनाडूमध्ये 154, तेलंगाणामध्ये 71 आणि आंध्र प्रदेशात 60 जणांचा मृत्यू झाला आहे.
केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं