CoronaVirus News : 'या'मुळे घेण्यात आला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय, नीती आयोगाने सांगितले 'असे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 05:56 PM2020-05-03T17:56:58+5:302020-05-03T18:38:48+5:30
देशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी, 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर गेला आहे. तर जवळपास 11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. असे असतानाच, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लवकरच कुठल्याही क्षणी स्थिर होऊ शकते, असे म्हटले आहे. याच बोरोबर, पहिल्या आणि दुसऱ्या पायऱ्यांच्या प्रतिबंधांमुळे जो फायदा झाला आहे, तो कायम ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असेही ते म्हणाल.
'या'मुळे वाढवण्यात आला लॉकडाउन -
पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, लॉकडाउनचा खरा हेतू, कोरोना व्हायरसची चैन तोडणे, असा आहे. यामुळेच 3 मेनंतरही लॉकडाउनचा काळ वाढवण्यात आला. मात्र, लॉकडाउन एकदमच हटवला असता, तर हेतू साध्य झाला नसता. तसेच जेथे चांगली स्थिती आहे, तेथे लक्षपूर्वक लॉकडाउन काढण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर
यावेळी पॉल यांना विचारण्यात आले, की भारतात कम्युनिटी ट्रांसमिशन अर्थात कोरोना तीसऱ्या टप्प्यावर गेला का? यावर त्यांनी सरळ उत्तर देणे टाळले आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही प्रतिबंधात्मक रणनीतीनुसारच असल्याचे सांगितले.
पूर्वीच्या तुलनेत चांगली स्थिती -
पॉल म्हणाले, आपण लॉकडाउनपेक्षाची चांगल्या स्थितीकडे वाटचाल करत आहोत. लॉकडाउनपूर्वी दर 5 दिवसाला कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत होती. आता दुपटीचा रेट 11-12 दिवसांवर गेला आहे. आशाप्रकारे कोरोना व्हायरस पसरण्याचा दर कमी झाला असून तो कधीही स्थिर होऊ शकतो.
रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग
कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारच्या नजीक -
देशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी, 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर गेला आहे. तर जवळपास 11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत 66 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.