CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 15:10 IST2020-05-31T15:08:34+5:302020-05-31T15:10:56+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग याद्वारे काळजी घेतली जात आहे.

CoronaVirus News : भयंकर! जेवणात आढळला विंचू; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार
दरभंगा - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असून रुग्णांची संख्याही 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. तर पाच हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग याद्वारे काळजी घेतली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले असून तेथे नागरिकांची काळजी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे.
क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांना देण्यात आलेल्या जेवणात विंचू आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यामध्ये ही भयंकर घटना घडली. प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. मनोज यादव या व्यक्तीला दिलेल्या जेवणात विंचू आढळून आला आहे. हे जेवण जेवल्यामुळे काही जण आजारी पडल्याची देखील माहिती मिळत आहे. काही दिवसांपासून क्वारंटाईन सेंटरमधील अस्वच्छता, अपुरे नियोजन, जेवण अशा अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/16eDMSj7CA#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील एका शाळेत काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दुपारी जेवताना मनोज यांना ताटात असलेल्या भाजीच्या वाटीत मेलेला विंचू सापडला. त्यांच्यासोबत इतरही दहा जण जेवत होते. हे जेवण जेवल्यानंतर काही लोकांची प्रकृती बिघडली, उलटीचा त्रास सुरू झाला. विंचू सापडल्यानंतर 45 जणांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लोकांची माफी मागितली तसेच असा प्रकार होणार नाही असे आश्वासन दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'या' ठिकाणी लढवण्यात आली अनोखी शक्कलhttps://t.co/rjjwhTowSP#CoronaUpdatesInIndia#CoronavirusIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
लॉस एंजिल्स, फिलाडेल्फियासह 16 राज्यांतील 25 शहरांमध्ये कर्फ्यू https://t.co/nDrhByue9G#America#Police
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2020
महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक
"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"
CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक
CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र
CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान
CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी