CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 11:06 AM2020-08-01T11:06:16+5:302020-08-01T11:14:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

CoronaVirus Marathi News Single day spike of 57,117 cases India 24 hour | CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरातील कोरनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून तब्बल सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

 गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 57,117 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 764 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 36,511 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (1 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 16,95,988 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 36 हजारांवर पोहोचला आहे. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,65,103 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10,94,374  रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन हटवल्यानंतर आता आजपासून देशात अनलॉक-3 च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओडिशा आणि केरळमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दर सर्वाधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल

CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई

 

Web Title: CoronaVirus Marathi News Single day spike of 57,117 cases India 24 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.