CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 10:17 AM2020-08-08T10:17:52+5:302020-08-08T10:25:09+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 

CoronaVirus Marathi News Single day spike of 61,537 cases India in 24 hours | CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 20 लाखांच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (8 ऑगस्ट ) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61,537 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 933 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20,88,612 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 42,518 वर पोहोचला आहे. 

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,19,088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 14,27,006 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 724,081 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 19,545,326 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या

"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"

Air India Plane Crash : 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात, महाराष्ट्रानेही अनुभवलीय दाहकता

'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील'; भाजपा नेत्याचं विधान

CoronaVirus News : हृदयद्रावक! बालकांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, ४२ जणांचा वाचवला होता जीव

Sushant Singh Rajput Case: "आदित्यजी चिंता नको, मुंबई पोलीस सक्षम की बिहार? हे शेंबडं पोरगंही सांगेल"

Breaking: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जैसे थे; आरबीआयकडून EMI सवलतीवर सस्पेन्स कायम

Web Title: CoronaVirus Marathi News Single day spike of 61,537 cases India in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.